Advertisement

पूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरु केल्यानंतर एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ

एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरू केल्यानंतर ही वाढ झाली आहे.

पूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरु केल्यानंतर एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ
SHARES

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरू केल्यानंतर ही वाढ झाली आहे. त्याशिवाय, ५ दिवसांत १ लाख प्रवाशांची भर पडली आहे. मुंबई आणि औरंगाबाद प्रदेशातून सर्वाधिक प्रवास होत आहे. लॉकडाऊनंतर १८ सप्टेंबरपासून पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी धावू  लागल्या.

१७ सप्टेंबरला ४ हजार ४१० बसगाड्यांच्या १६ हजार ३४७ फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. यातून ४ लाख ९० हजार ७३८ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. २२ सप्टेंबरला ४ हजार ८८५ गाडय़ांच्या १७ हजार २४४ फेऱ्या झाल्या. यामधूनही ५ लाख ९७ हजार ६३५ प्रवाशांनी प्रवास केला आहे. ५ दिवसांत १ लाख ६ हजार ८९७ प्रवाशांची भर पडली.

मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या मुंबई प्रदेशातून १ लाख ३८ हजार ८४२ प्रवाशांनी, तर औरंगाबाद, बीड, जालना,लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या औरंगाबाद प्रदेशातून १ लाख ६८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पुणे प्रदेशात, तर नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर यासह राज्याच्या अन्य भागांतूनही प्रवास होत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा