Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

मुंबई लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मुंबई लोकल ट्रेनमध्ये पुन्हा सामाजिक अंतराच्या नियमांच उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलं आहे.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
SHARES

मुंबई लोकल ट्रेनमध्ये पुन्हा सामाजिक अंतराच्या नियमांच उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलं आहे. रेल्वे प्रशासनानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लोकलमधील सीटवर स्टीकर चिटकवले होते. एक सीट सोडून एक अशी बसण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनानं लोकलमध्ये केली होती. परंतू, रेल्वे प्रवाशांनी या नियमाचं उल्लंघन करत नियमीतपणे सीटवर बसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मध्य रेल्वे सीएसएमटी स्थानकातून बदलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या ४.४५ वाजताच्या जलद लोकलमध्ये प्रवासी स्टीकर लावलेल्या सीटवर ही बसल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार गर्दी न करण्याचं आवाहन करूनही प्रवासी लोकलमध्ये गर्दी करत आहे. याबाबत आता रेल्वे प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मुंबईतील रेल्वेच्या स्टेशनवरही तपासणी सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं. 'मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात आहे. बेड योग्य प्रकारे उपलब्ध आहेत. कोरोनाची लाट येईल की नाही हे माहीत नाही. पण पालिकेनं याचे नियोजन सुरू केलं आहे. त्यामुळं आता लोकांनी जे नियम दिले ते पाळणं गरजेचं असल्याचं महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी म्हटलं. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा