Advertisement

वीज बिल भरणा केंद्रावर रांगाच रांगा


वीज बिल भरणा केंद्रावर रांगाच रांगा
SHARES

मुंबई - सरकारी रुग्णालयं, वीज बिल भरणा केंद्र आदी ठिकाणी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची अंतिम तारीख शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंतच आहे. त्यामुळे वडाळा बेस्ट आगार इथल्या वीज बिल भरणा केंद्रावर नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत विद्युत भरणा केंद्र सुरू राहणारायेत. "दररोज अंदाजे 3 कोटी रूपये वीज बिलामार्फत बेस्टकडे जमा होतात. मात्र शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत 10 कोटी रुपये जमा झाले आहेत," असे बेस्ट मुख्य जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement