Advertisement

याचिकाकर्त्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव


याचिकाकर्त्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्ग 3ला नुकताच उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. पण उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला अखेर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती 'सेव्ह ट्री'चे सदस्य झोरू बाथेना यांनी दिली. उच्च न्यायालयाची झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती 15 मे पर्यंत कायम असणार असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, अशी अपेक्षा याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे. झाडांवरील स्थगिती कायम ठेवण्याची मुख्य मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परवीना जहांगीर आणि निना वर्मा या 'सेव्ह ट्री'च्या दोन सदस्यांनी फेब्रुवारीमध्ये मेट्रो-3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार फेब्रुवारीमध्येच न्यायालयाने झाडांच्या कत्तलीला स्थगिती दिली होती. गेल्या आठवड्यात यावर न्यायालयाने अंतिम सुनावणी देत मेट्रो-तीनला हिरवा कंदील देत ही स्थगिती उठवली. मात्र त्याचवेळी याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देत स्थगिती 15 मे पर्यंत कायम ठेवली आहे. त्यानुसार याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करत मंगळवारी अखेर याचिका दाखल केली.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, पण या निर्णयामुळे आम्ही निराश झालोय. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल झाली, तर खरोखर मुंबईत पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाकडून तरी, आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्यांनी दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा