Advertisement

पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर, मुंबईत 'इतका' आहे दर

मागील काही दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तेल कंपन्यांकडून वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे देशातील तेल कंपन्या इंधनांचे दर वाढवत आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर, मुंबईत 'इतका' आहे दर
SHARES

 पेट्रोल, डिझेलचे दर  मंगळवारी उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.  पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर ३५ पैशांची वाढ झाली आहे. आता मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ९३.८३ आणि ८४.३६ प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

दिल्लीत पेट्रोलचा दर ३३ पैसे प्रति लिटरने वाढून ८७.३० रुपये प्रति लिटर तर डिझेल ७७.४८ रुपये प्रती लिटर मिळत आहे. चेन्नईत पेट्रोल ८९.७० रुपये आणि डिझेल ८२.६६ प्रति लीटर तर कोलकातामध्ये पेट्रोल ८८.६३ आणि डिझेल ८१.०६ रुपये प्रति लीटर झालं आहे.

मागील काही दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तेल कंपन्यांकडून वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे देशातील तेल कंपन्या इंधनांचे दर वाढवत आहेत.  सोमवारी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६० डॉलरच्या वर गेले आहेत. प्रति बॅरल १.२६ टक्क्यांनी वाढून ते ६०.१९ डॉलर झाले आहे. अर्थसंकल्पात पेट्रोल वर २.५ रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर ५ रुपये प्रति लीटर 'एग्री इन्फ्रा सेस' लावला जाणार आहे. 


हेही वाचा -

मुंबईत सीएनजी, पीएनजी गॅस महागला

लोकलचं सध्याचं वेळापत्रक १५ दिवसांनंतर बदलणार?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा