मुंबईत पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले


SHARE

रुपयाची होत असलेली घसरण आणि आंतराष्ट्रीयबाजारपेठेत इंधनाच्या दरात होत असलेली वाढ यामुळे इंधनाचे दररोज वाढताना दिसत आहे. याचाच परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होताना दिसत आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोलचा दर ८७ रुपये ७७ पैशांवर तर डिझेलचा दर ७६ रुपये ९८ पैशांवर पोहचला. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पेट्रोल ३८ पैशांनी महागले.


सामान्यांना महागाईचा मार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे. वर्षभरापूर्वी पेट्रोलचे दर प्रति लिटर ७५ रुपयांच्या खाली होते, तर डिझेलचे दर प्रति लिटर ५५ रूपयांच्या आसपास होते. या इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.


१० सप्टेंबरला भारत बंद?

यानिमित्ताने केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी या इंधनाच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळेच देशभरात १० सप्टेंबरला कडकडीत बंद पाळण्यात येईल. निषेध मोर्चा काढठिकठिकाणी ण्यात येतील, असा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या