Advertisement

कोरोनापासून संरक्षणासाठी एसटी चालकाच्या कॅबिनला प्लास्टिक शिल्ड

एसटी बस चालकाच्या कॅबिनला आयसोलेशनमध्ये रूपांतर करण्याची सुरुवात केली आहे.

कोरोनापासून संरक्षणासाठी एसटी चालकाच्या कॅबिनला प्लास्टिक शिल्ड
SHARES

लॉकडाऊनच्या काळात एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूकसेवा देत आहे. राज्यभरातील विविध ठिकाणी ही सुविधा पुरविली जात आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका आहे. हा धोका लक्षात घेत त्यांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळानं एसटी बस चालकाच्या कॅबिनला आयसोलेशनमध्ये रूपांतर करण्याची सुरुवात केली आहे. चालकाच्या कॅबिनचा दरवाजा पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावून बंदिस्त करण्याची सुरुवात केली आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा धोका पत्करून एसटी बसचे चालक-वाहक  अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एसटी महामंडळाने बेस्टसारखी संकल्पना तयार केली आहे. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात दररोज बेस्टच्या फेऱ्या धावत आहेत. मात्र कोरोनाच्या संक्रमणामुळं बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. 

बुधवारपर्यंत कोरोनामुळे बेस्टच्या ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, १०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बेस्ट प्रशासनाकडून नुकताच एक संकल्पना तयार केली आहे. चालकाच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवासी आणि बेस्टचा चालकाचा संपर्क होणार नाही. 

बेस्ट प्रशासनानंतर आता एसटी महामंडळ देखील अशी संकल्पना एसटी बसला केली आहे. एसटी महामंडळाच्या यंत्र आणि अभियांत्रिकी विभागातील अधिकारी यांनी अत्यंत कमी बजेटमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातील एसटी बसमध्ये ही व्यवस्था करण्यात आली असून एसटी  कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ झालेले आहे.



हेही वाचा -

घाटकोपर, मुलुंड, भांडुपमध्ये चिंता वाढली, रुग्णदुपटीचा कालावधी घटला

'नवरी नटली' फेम लोककलावंत छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा