Advertisement

पीएनबी, एसबीआय जेट एअरवेजला तारणार, देणार आपत्कालीन कर्ज

जेट एअरवेजचा व्यापार बुडू नये यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेनं कंपनीला आपत्कालीन कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. तसंच, जेट एअरवेजला संकटातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे.

पीएनबी, एसबीआय जेट एअरवेजला तारणार, देणार आपत्कालीन कर्ज
SHARES

गेल्या ३ महिन्यांपासून जेट एअरवेज कंपनीला व्यापारात मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे. या तोट्यामुळे देशी-विदेशी बँकांकडून घेतलेलं कर्ज देखील जेट एअरवेजला पूर्णपणे फेडता आलं नाही. त्यामुळं जेट एअरवेजचा व्यापार बुडू नये यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेनं कंपनीला आपत्कालीन कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. तसंच, जेट एअरवेजला संकटातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे. 


किंगफिशरची पुनरावृत्ती नको

कर्जात वाढ झाल्यानं कंपनीला अनेक कर्मचाऱ्यांचे पगार देणं अवघड ठरत आहे. त्याशिवाय 'जेटच्या रुपाने किंगफिशरची पुनरावृत्ती होऊ देऊ नका', अशी हाक सरकारनं सर्व बँकांना दिली होती. त्यामुळे कर्ज देणाऱ्या २६ बँकांपैकी पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाने या २ बँकांनी जेट एअरवेजची मदत करण्यास पुढाकार घेतला आहे. या कर्जामुळं कंपनीचा व्यापार सुरू राहील इतकं आर्थिक साहाय्य मिळणार आहे. 


२६ बँकांचं कर्ज

या कर्जानं जेट एअरवेजचा व्यापार पूर्ववत झाल्यास सर्वच कर्ज त्यांना फेडावं लागणार आहेत. मात्र, कर्ज फेडता आलं नाही तर, जेट एअरवेज विकण्याशिवाय मालकांकडे कोणताच पर्याय उपलब्ध राहणार नाही. दरम्यान, आतापर्यंत जेट एअरवेजनं कॅनेरा बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि अलाहबाद बँक या राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलं आहे. त्याशिवाय, अनेक देशी-विदेशी आणि खाजगी बँकांनीही जेट एअरवेजला कर्ज दिलं असून जेट एअरवेजवर एकूण २६ बँकांचे कर्ज झालं आहे.



हेही वाचा -

'तोकडे कपडे घालू नका’,जे. जे. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थ्यांना आदेश

डीएमके पक्षाच्या प्रवक्त्याची हत्या करणाऱ्यास अटक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा