Advertisement

'तोकडे कपडे घालू नका’,जे. जे. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थ्यांना आदेश

सर जे.जे. रुग्णालयात होळीदरम्यान विद्यार्थ्यांनी तोकडे कपडे घालून ते फाडल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे वैद्यकीय कॉलेजच्या परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तोकडे कपडे घालून फिरु नये, अशा नियमांचा मेसेज जे. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्या नावाने जे. जे. मेडिकल कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेल फिरत आहे.

'तोकडे कपडे घालू नका’,जे. जे. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थ्यांना आदेश
SHARES

सर जे.जे. रुग्णालयात होळीदरम्यान विद्यार्थ्यांनी तोकडे कपडे घालून ते फाडल्याचा प्रकार घडला उघडकीस आला होता. त्यामुळे वैद्यकीय कॉलेजच्या परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तोकडे कपडे घालून फिरु नये, कॉलेजच्या 'अस्तित्त्व' या युवा महोत्सवात मुलींनी तोकडे कपडे घालू नये, त्याशिवाय रात्री १० च्या आत विद्यार्थिनींनी हॉस्टेलमध्ये यावं, अशा नियमांचा मेसेज जे. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्या नावाने जे. जे. मेडिकल कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेल फिरत आहे.


विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध

जे. जे. रुग्णालयात 'होळी'निमित्त रुग्णालयाच्या परिसरात दिंडी काढण्यात येते. तसंच, या दिंडीचा मुलींच्या वसतीगृहाजवळ समारोप होतो. मात्र, यावेळी विद्यार्थी नृत्य करत असताना कपडे फाडल्याचा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे 'अस्तित्व' महोत्सवात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि मुलींच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या नियमांचा तीव्र निषेध केला आहे. 


मेसेजद्वारे नियम

दरम्यान, जे. जे. मेडिकल कॉलेजच्या वाॅर्डन शिल्पा पाटील यांच्या नावाने कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा मेसेज फिरत असल्याचं समजतं आहे. तसंच, कॉलेजमधील 'अस्तित्त्व' या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हॉस्टेलच्या वॉर्डनकडून डीन चंदनवाले यांच्या नावाने मेसेज फॉरवर्ड करण्यात आला आहे. 



हेही वाचा -

जेट एअरवेजच्या ६ परदेशी फेऱ्या रद्द

मुंबईकर हाॅट सीटवर, तापमान गेलं ४० अंशांच्या पुढे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा