Advertisement

मुंबईकर हाॅट सीटवर, तापमान गेलं ४० अंशांच्या पुढे

मुंबईकरांचा विकेंड चांगलाच उकाड्याचा ठरला. मुंबईच्या तापमानाने ३५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारल्याने शनिवार आणि रविवारच्या दुपारी मुंबईकरांना घरातच राहणं पसंत केलं.

मुंबईकर हाॅट सीटवर, तापमान गेलं ४० अंशांच्या पुढे
SHARES

मुंबईकरांचा विकेंड चांगलाच उकाड्याचा ठरला. मुंबईच्या तापमानाने ३५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारल्याने शनिवार आणि रविवारच्या दुपारी मुंबईकरांना घरातच राहणं पसंत केलं.  मार्च महिन्याला सुरूवात होताच राज्यातील तापमानात वाढ व्हायला सुरूवात झाली. काही ठिकाणी तर तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचलं. परंतु आतापर्यंत गार वाऱ्याचा सुखद अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना कडाक्याच्या उन्हाची झळ बसली नव्हती.   


तापमानात वाढ

कुलाबा इथं रविवारी किमान तापमान २४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस इतकं होतं. आर्द्रतेचं प्रमाण ५५ टक्क्यांपर्यंत होतं. त्यामुळे आलेल्या वाऱ्यांमुळे दुपारी उष्णतेच्या झळा जास्त जाणवल्या. सांताक्रूझ इथं रविवारी सकाळी किमान तापमान २१.४ अंश सेल्सिअस होतं, तर कमाल तापमानाने ३६.७ अंशांपर्यंत उसळी घेतली. रविवारी सांताक्रूझ परिसरातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांची वाढ झाल्याची माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली.


तब्येतीची काळजी घ्या

मुंबईतील तापमानात वाढ झाल्यामुळे मुंबईकरांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहन डाॅक्टरांकडून करण्यात येत आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान आपल्याजवळ पाण्याची बाटली ठेवावी. तसंच सरबत, काकडी यासारख्या अन्नपदार्थांचं सेवन करावं. तापमानात वाढ झाल्याने सर्दी, खोकला स्वाईन फ्लू यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळं कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांचा सल्ला तातडीनं घेणं गरजेचं आहे.



हेही वाचा -

पावसाळ्यात लोकलखोळंबा टाळण्यासाठी 'परे'वर पर्जन्यमापक यंत्रणा

मुख्यमंत्र्यांकडून राज्यसभेचे आश्वासन मिळाल्याने आठवलेंची लोकसभेतून माघार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा