Advertisement

पावसाळ्यात लोकलखोळंबा टाळण्यासाठी 'परे'वर पर्जन्यमापक यंत्रणा

मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यानं रेल्वे मार्गांवरील रुळांवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे पावसाळ्यात होणारा हा लोकलखोळंबा टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनानं रेल्वे मार्गावर पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

पावसाळ्यात लोकलखोळंबा टाळण्यासाठी 'परे'वर पर्जन्यमापक यंत्रणा
SHARES

दरवर्षी पावासाळ्यात मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यानं रेल्वे मार्गांवरील रुळांवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे पावसाळ्यात होणारा हा लोकलखोळंबा टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनानं रेल्वे मार्गावर पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील १० जागा निश्चित झाल्या असून, एप्रिलमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचं समजतं आहे.


१० ठिकाणं निश्चित

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते भाईंदर स्थानकांदरम्यान पर्जन्यमापक बसवण्यसाठी १० ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. त्याशिवाय या ठिकाणी बसवण्यात येणारी पर्जन्यमापक उपकरणं हवामान विभागाला मिळाली असून हे काम एप्रिलमध्ये पूर्ण करण्यात येणार  आहे. तसंच, आयआयटी मुंबई आणि हवामान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अतिवृष्टीचा इशारा देणारी ही यंत्रणा मुंबईत कार्यान्वित झाल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. ही यंत्रणा दर १५ ते २० मिनिटांनी पावसाच्या नोंदी घेणार आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावर सखल भाग असल्यामुळं रुळांवर पाणी साचून लोकल वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे मागील वर्षी मध्य रेल्वे आणि हवामान विभागानं रेल्वे मार्गांवर पर्जन्यमापक यंत्रणा बसवण्याची तयारी दर्शवली होती. त्याशिवाय या उपकरणांच्या माध्यमातून मिळणाऱ्या निरीक्षणांच्या आधारे एक अॅप देखील तयार करण्यात येणार होते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा सफल न झाल्याने प्रवाशांना यंदाच्या पावसाळ्यात मध्य रेल्वेवर पर्जन्यमापक यंत्रणा कार्यन्वित करण्यात येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

मुख्यमंत्र्यांकडून राज्यसभेचे आश्वासन मिळाल्याने आठवलेंची लोकसभेतून माघार

मुंबई इंडियन्सची ओपनिंग पराभवाने, दिल्ली ३७ धावांनी विजयी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा