प्रवाशांकरीता मुंबई सेंट्रल स्थानकात ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती

मुंबई सेंट्रल स्थानकावरील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी, तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती करण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)तर्फे हे पॉड हॉटेल बांधण्यात येणार आहे.

SHARE

पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनसप्रमाणं मुंबई सेंट्रल स्थानकातून देखील लांबा पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येतात. त्यामुळं मुंबई सेंट्रल स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. अशावेळी स्थानकावरील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी, तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती करण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) तर्फे हे पॉड हॉटेल बांधण्यात येणार आहे. 


आरामदायी, आत्याधुनिक सुविधा

मुंबई सेंट्रल स्थानकावरील एकूण चार हजार चौरस फुटांच्या जागेवर पॉड हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवाशांना वाय-फाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकूलित रूम, विश्रांतीसाठी आरामदायी व्यवस्था विद्युत दिवे, हवेशीर जागा, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसंच, प्रवाशांना १२ तास विश्रांती करता येणार आहे.


प.रे. प्रशासनाची मंजुरी

आयआरसीटीसीकडून ३० पॉड (खोल्या) ची उभारणी करण्यात येणार आहे. या संदर्भात आयआरसीटीसीनं पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळं लवकरच प्रवाशांकरीता आरमदायी 'पॉड' हॉटेलची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. , मुंबई सेंट्रल स्थानकावर उभारण्यात येणाऱ्या पॉडची सुविधा यशस्वी ठरल्यास, इतर ठिकाणीही अशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचं समजतं.हेही वाचा -

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार दुसरी एसी लोकल

लॉ आणि सीएसची परीक्षा एकत्र, परीक्षा लवकर घेण्याची संघटनांची मागणी
संबंधित विषय
ताज्या बातम्या