Advertisement

लॉ आणि सीएसची परीक्षा एकत्र, परीक्षा लवकर घेण्याची संघटनांची मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई विद्यापीठामध्ये लॉ च्या परीक्षा वेळापत्रक निकाल गोंधळ यांसारखे विविध गोंधळ समोर येत होते. या प्रकरणाला काही प्रमाणात का होईना ब्रेक लागला असताना पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठात परीक्षा एकत्र येण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

लॉ आणि सीएसची परीक्षा एकत्र, परीक्षा लवकर घेण्याची संघटनांची मागणी
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई विद्यापीठामध्ये लॉ च्या परीक्षा वेळापत्रक निकाल गोंधळ यांसारखे विविध गोंधळ समोर येत होते. या प्रकरणाला काही प्रमाणात का होईना ब्रेक लागला असताना पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठात परीक्षा एकत्र येण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या जून महिन्यात विधी (लॉ) आणि कंपनी सेक्रेटरी या दोन अभ्यासक्रमाच्या परीक्षा एकत्रित होणार आहे. यामुळे विद्यापीठाने लॉ च्या परीक्षा लवकर घ्यावी अशी मागणी स्टुडंट लॉ काऊन्सिले केली आहे. 


परीक्षा कधी ?

येत्या मे २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात एल.एल.बी पाच वर्ष, तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार असून नुकतच या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. यानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून परीक्षेला सुरूवात होणार असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या परीक्षा चालणार आहेत. परंतु येत्या १ जूनपासून कंपनी सेक्रेटरी (सीएस) या अभ्यासक्रमाची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा १० जूनपर्यंत चालणार असून या दरम्यान लॉ चीही परीक्षा होणार आहे. यामुळे लॉ आणि सीएस परीक्षा एकत्रित येण्याची दाट शक्यता असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. परीक्षा लवकर घ्या 

याबाबत स्टुडंट लॉ काऊन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना लॉ च्या परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घ्याव्यात अशी मागणी केली आहे. परीक्षा मे महिन्याच्या सुरूवातीला झाल्याने परीक्षा लवकर होतील आणि निकालही वेळेत जाहीर होतील. तसेच सीएसच्या परीक्षेसोबत लॉ च्या परीक्षा एकत्रित येत असल्याचही टाळता येईल. हेही वाचा -

घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर; जीएसटी ७ टक्क्यांनी कमी

शिक्षकांच्या आंदोलनामुळे बारावीचे निकाल रखडणारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा