'मरे'वर स्पेशल ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक

  Mumbai
  'मरे'वर स्पेशल ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक
  मुंबई  -  

  मध्य रेल्वेच्या मेन लाईन मार्गावरील बदलापूर स्थानकातील रुळाच्या देखरेखीसाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यत स्पेशल ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप धिम्या मार्गावर शनिवार रात्री ११.२० वाजल्यापासून रविवारी पहाटे ३.५० वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पळसदरी ते कर्जत अप मार्गावरही तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  ब्लॉक दरम्यान उपनगरीय मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक वळवण्यात आलेली आहे. अनेक मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांच्या मार्गात देखील बदल करण्यात आलेला आहे. तसेच या गाड्या १५ ते ३൦ मिनिटे उशीरा धावणार आहेत.

  ब्लॉकमुळे प्रभावित होणाऱ्या गाड्या

  १८५१९ विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस

  १२२९८ पुणे-अहमदाबाद दूरान्तो एक्स्प्रेस कर्जत

  १२७०२ हैद्राबाद-मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस

  ११०२०  भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस कर्जत

  ५१०२८ पंढरपुर-मुंबई फास्ट पॅसेंजर

  १६३८२ कन्याकुमारी-मुंबई एक्स्प्रेस

  ११३०६ म्हैसूर-दादर एक्स्प्रेस

  ११०२८ चैन्नई-मुंबई मेल  

  ब्लॉक दरम्यान १२२९८ पुणे-अहमदाबाद दुरान्तो एक्स्प्रेस कर्जत, पनवेल आणि वसई मार्गाने चालवण्यात येणार आहे. त्यामुळे वसई रोड स्थानकात ही एक्सप्रेस ३० मिनिटे उशिराने पोहोचणार आहे. ११०२८ चैन्नई-मुंबई मेल, ११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा मार्गे धावणार असून दिवा स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या सीएसटी स्थानकात २० ते ३० मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. याशिवाय अप मार्गावरील ५१०२८ पंढरपुर-मुंबई फास्ट पॅसेंजर बदलापूर स्थानकात २० मिनिटे, १६३८२ कन्याकुमारी-मुंबई एक्स्प्रेस,१८५१९ विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस, १२७०२ हैद्राबाद-मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस आणि ११३०६ म्हैसूर-दादर एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० ते ३० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

  सीएसटी-बदलापूर शनिवारी रात्री ९.४९ ची लोकल अंबरनाथ स्थानकापर्यत आणि बदलापूर-सीएसटी रात्री ११.५० ची लोकल अंबरनाथ स्थानकातून चालवण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान लोकल गाड्यांची वाहतूक बंद असणार आहे. लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेस हैदराबाद-मुंबई (१७०३२), कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (११०१४), या गाडयांना पळसदरी स्थानकांदरम्यान थांबा देण्यात येणार नसून नियमित वेळापत्रकाच्या ३० मिनीट उशीर होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.