Advertisement

पंचवटी एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी आलेल्या बिपीन गांधींचा मृत्यू


पंचवटी एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी आलेल्या बिपीन गांधींचा मृत्यू
SHARES

रेल प्रवासी संघटनेचा आजचा म्हणजेच बुधवार हा आनंदाचा दिवस! कारण याच दिवशी प्रवाशांना मनमाड-मुंबई, अशा नवीन स्वरुपातील एक्स्प्रेसचा आनंद लुटता येणार आहे. पण अशातच एख दुखद घटना घडली आहे. मुंबईचा प्रवास करणाऱ्यांसाठी अख्खं आयुष्य खर्ची घालणाऱ्या आणि पंचवटी एक्सप्रेससाठी खस्ता खाणाऱ्या बिपीन गांधी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.


एक्स्प्रेसच्या स्वागतापूर्वीच निधन

बिपीन गांधी नवीन पंचवटी एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या प्लॉटफॉर्म क्रमांक ३ वर येण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ते ६५ वर्षांचे होते.

पंचवटी एक्स्प्रेसच्या बोगीची आतील व्यवस्था विमानाप्रमाणे असावी या मागणीसाठी गांधी यांनी रेल्वे मंत्रालयाला भंडावून सोडलं होत. यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. त्यानुसार पंचवटी एक्सप्रेसच्या प्रत्येक डब्यांमध्ये बदल करण्यात आले. आणि ही एक्स्प्रेस बुधवारपासून सुरू झाली. या गाडीचं स्वागत करण्यासाठी बिपीन गांधी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते. मात्र नाशिकरोड स्टेशनवर येण्याआधीच गांधी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


प्रवाशांनी व्यक्त केली हळहळ

गांधी यांच्या प्रयत्नांनी रेल्वे बोगीत मेडिटेशन, रेल्वे होस्टेस, बाहेरील खाद्य पदार्थांना बंदी आणि कचरामुक्त बोगी, असे अनेक विविध उपक्रम ते राबवत असत. इतकेच नव्हे तर या बोगीचा वाढदिवस दरवर्षी ते साजरा करत असत. पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श एक्स्प्रेस बनवणारे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांच्या अकाली जाण्याने प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा