दहिसर आरटीओ कार्यालयावर मोर्चा

 Dahisar
दहिसर आरटीओ कार्यालयावर मोर्चा
दहिसर आरटीओ कार्यालयावर मोर्चा
See all

दहिसर - कांदरपाडा परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर स्थानिकांनी मोर्चा काढला. नवीन परवाना, परवाना नुतनीकरण, वाहन हस्तांतरण ही कामे या परिवहन कार्यालयात केली जात आहेत. मात्र परिवहन कार्यालयात जागा कमी असल्यामुळे वाहने बाहेर उभी केली जात आहेत. तसेच कार्यालयाच्या बाहेर अनधिकृतपणे दलालांनी स्टॉल थाटले आहेत. बेकायदेशीर वाहने पार्किग केली जात आहेत. याचा त्रास बाजूला राहत असलेल्या नागरिकांना होतोय. याविषयी नागरिकांनी परिवहन कार्यालयाकडे वारंवार तक्रार केली. मात्र या तक्रारीकड़े परिवहन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर नागरिकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला.

Loading Comments