Advertisement

बेस्ट संपाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका


बेस्ट संपाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका
SHARES

मंगळवारी मध्यरात्रीपासून बेस्टचे ३० हजारांहून अधिक कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. तीन दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यावर एकही बस धावू शकली नसल्याने मुंबईकरांना टॅक्सी-रिक्षासारखे महागडे पर्याय निवडावे लागत आहेत. त्यामुळे मुंबईकर वेठीस धरला जात असल्याचं म्हणत मुंबईकरांचे हे हाल मांडणारी जनहित याचिका अखेर मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असून यावर तात्काळ शुक्रवारी, ११ जानेवारीला सुनावणी होणार आहे. 


तोडगा नाही

अॅड. दत्ता माने यांनी बेस्टच्या संपाविरोधात गुरूवारी जनहित याचिका दाखल केली आहे. बेस्ट सेवा ही अत्यावश्यक सेवा असून न्यायालयानं कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नये अशी ताकीद याआधीच दिलेली आहे. असं असतानाही न्यायालयाच्या आदेशाला डावलून संप पुकारण्यात आला आहे. संप सुरू होऊन तीन दिवस झाले तरी संप मिटवण्यासाठी काहीही प्रयत्न होत नाहीत. संपावर तोडगा काढण्यासाठी केवळ बैठकांवर बैठकाच सुरू आहेत. पण प्रत्यक्षात काहीही तोडगा निघताना दिसत नाही.


प्रवाशी बेहाल 

बेस्टच्या या संपामुळे मुंबईकर प्रवाशी बेहाल झाले आहेत. मुंबईकर प्रवाशांचे हेच हाल न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी माने यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता संप मिटतो का आणि या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देते याकडंच मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. 



हेही वाचा - 

सलग तिसऱ्या दिवशीही प्रवाशी बेहाल




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा