कुर्ला स्टेशनवर आरपीएफ पोलिसांची तपासणी

कुर्ला - दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर जिलेटिनच्या चार कांड्या आढळल्या होत्या. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली आहे. रेल्वे आणि पोलीस प्रशासन आता कामाला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीएफ पोलिसांनी शनिवारी रात्री कुर्ला स्टेशन परिसरात रेल्वे रूळांवर उतरुन तपासणी केला. यावेळी संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली. स्निफर डॉगच्या मदतीने स्टेशनचा पूर्ण परिसर आरपीएफ पोलिसांनी पिंजून काढला. रेल्वे परिसरात घातपाताच्या घटनांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे आरपीएफ पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Loading Comments