हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
See all
मुंबई  -  

हार्बर रेल्वेच्या चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्यामुळे शुक्रवारी सकाळी अप मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक लोकल गाड्या चेंबूर स्टेशनच्या अलीकडे जागेवरच अडकून पडल्या होत्या. सुमारे अर्धा तास वाट पाहिल्यानंतर कामावर निघालेल्या चाकरमान्यांनी अखेर रेल्वेतून उतरून पुढील मार्गक्रमण सुरू केले. 

याबात रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता चेंबूरजवळ अप मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याने रेल्वे सेवा ठप्प झाल्याचे सागितले. त्याचबरोबर तडा गेलेल्या रेल्वे रुळाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान पाऊण तासानंतर या मार्गावरील सेवा हळूहळू सुरू करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. काही दिवसांपूर्वी या मार्गावर सकाळी ऐन कामाच्या वेळात तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक खोळंबल्याची घटना घडली होती.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.