चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान रेल्वे रुळाला तडा

 Kurla
चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान रेल्वे रुळाला तडा
चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान रेल्वे रुळाला तडा
See all

कुर्ला - हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान डाउन दिशेच्या रेल्वेरुळाला तडा गेल्यानं या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झालीय. हार्बरच्या गाड्या त्यामुळे 10 ते 15 मिनिटे उशिरानं धावत आहेत. पाच तास उलटूनही रुळाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळे स्थानकांत प्रवाशांची चांगलीच गर्दी उसळली होती. या गर्दीला आवरण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जीआरपी आणि आरपीएफकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Loading Comments