हार्बरवर रेल्वे रुळाला तडा, तब्बल २ तास वाहतूक विस्कळीत

Mazgaon Dock
हार्बरवर रेल्वे रुळाला तडा, तब्बल २ तास वाहतूक विस्कळीत
हार्बरवर रेल्वे रुळाला तडा, तब्बल २ तास वाहतूक विस्कळीत
See all
मुंबई  -  

हार्बर मार्गावरील रे रोड ते डाॅकयार्ड रोड रेल्वे स्थानकादरम्यान पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळाला मंगळवारी दुपारी 12.35 वाजता तडा गेला. यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. हा रूळ दुरुस्त केल्यानंतर तब्बल पावणे दोन तासांनी दुपारी 2.12 वाजता पहिली लोकल रवाना झाली. दरम्यान, वडाळा रोड ते पनवेल आणि वडाळा रोड ते वांद्रे, अंधेरी अशी वाहतूक वळविण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

हार्बर मार्गवरील रे रोड ते डाॅकयार्ड रोड रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन दिशेच्या रेल्वे रुळाला तडा गेल्याचे सीएसटीवरून पनवेलला निघालेल्या लोकलच्या मोटारमनला दिसले. त्यांनी हा प्रकार तात्काळ रे रोड रेल्वे स्थानक व्यवस्थापक व लोहमार्ग पोलिसांना कळवला. त्यानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर पावणे दोन तासांनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दुपारी 2.12 वाजता पहिली लोकल रवाना करण्यात आली.


हेही वाचा

रुळावर पडलेला खांब..मोटरमनची सतर्कता..आणि पहाटेचा 'तो' अपघात!


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.