140 अनधिकृत झोपड्यांवर रेल्वेची कारवाई


  • 140 अनधिकृत झोपड्यांवर रेल्वेची कारवाई
  • 140 अनधिकृत झोपड्यांवर रेल्वेची कारवाई
  • 140 अनधिकृत झोपड्यांवर रेल्वेची कारवाई
SHARE

जोगेश्वरी - बांद्रेकरवाडीला लागून असलेल्या इंदिरा नगरमधील एकूण 140 अनधिकृत घरांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केलीय. ही घरे रेल्वे प्राधीकरणाच्या जागेत असल्यानं रेल्वेनं ही कारवाई केलीय. 2 महिन्यांपूर्वी रेल्वेनं या संदर्भातील नोटीस रहिवाशांना पाठवली होती. मात्र नोटीस पाठवूनही नागरिकांना प्रतिसाद न दिल्यानं रेल्वे प्रशासनाला हा कारवाई करावी लागली. दरम्यान घरं जर अनधिकृत होती तर सरकारने आम्हाला लाईट बील,आधार कार्ड,पॅन कार्ड या पत्त्यावर का दिले असा सवाल संतप्त नागरिकांनी प्रशासनाला विचारलाय. स्टे ऑर्डसाठी न्यायालयात रहिवाश्यांनी अर्ज दाखल केला असून रहिवाशी त्याच्याकडे नजर लावून बसलेत. स्थानिक नगरेसविका उज्वला मोडक यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिलाय. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या