Advertisement

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार?


रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार?
SHARES

बेरोजगाराला रोजगार देण्याचे आश्वासन देणारे सरकार आता काहीसे बदलताना दिसत आहे. रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे. कारण रेल्वे मंत्रालय खर्चात कपात करण्यासाठी रेल्वेच्या सर्व 17 विभागीय मंडळांतील सुमारे 11 हजार पदे रिक्त करण्याच्या विचारात आहे. सर्व विभागाच्या व्यवस्थापकांना तशा आशयाचे पत्रही पाठवण्यात आल्याची महिती दिल्लीतील रेल्वे बोर्डाकडून देण्यात आली आहे.

सध्या भारतीय रेल्वेत सुमारे 15 लाख कर्मचारी काम करत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना कमीत कमी कर्मचाऱ्यांसह काम करा, अशा सूचना रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दक्षिण, पूर्व आणि मध्य रेल्वे विभागांना 400 पदे कमी करण्यास सांगण्यात आले आहे.

कोणत्या विभागातील पदे कमी होणार

मध्य आणि पश्चिम रेल्वे - 1 हजार पदे

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे - 400 पदे

पूर्व तटीय रेल्वे - 700 पदे

उत्तर रेल्वे - 1500 पदे

उत्तर मध्य रेल्वे - 150 पदे

उत्तर पूर्व रेल्वे - 700 पदे

उत्तर पश्चिम रेल्वे - 300 पदे

पूर्व मध्य रेल्वे - 300 पदे

उत्तर पूर्व सीमा रेल्वे - 550 पदे

दक्षिण रेल्वे - 1500 पदे

दक्षिण मध्य रेल्वे - 800 पदे

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे - 400 पदे

दक्षिण पश्चिम रेल्वे - 400 पदे

पश्चिम रेल्वे - 700 पदे

पश्चिम मध्य रेल्वे - 300 पदे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा