घातपात रोखण्यासाठी रेल्वे पोलीस सतर्क

 wadala
घातपात रोखण्यासाठी रेल्वे पोलीस सतर्क

वडाळा - रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस अपघात घडवून आणण्यासाठी समाजकंटक रेल्वे रुळाला लक्ष्य करीत आहेत. या समाजकंटकांना आवर घालण्यासाठी प्राप्त धमक्यांच्या अनुषंगाने मुंबईतल्या सर्वच रेल्वे स्थानकावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी घाटकोपर येथील बीडीडीएस तंत्र पथक आणि डॉग स्कॉड पथक मॅक्स डॉगच्या सहाय्याने मध्य हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि शिवडी स्थानकात विशेष तपासणी करण्यात आली.

यात अडगळीच्या जागा, तिकीट बुकिंग ऑफिस, पादचारी पुलाखालील जागा तसेच स्थानकातील कानाकोपऱ्यांची काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. दरम्यान काहीही आक्षेपार्ह मिळून आलं नसल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. या तपासणीमध्ये डॉग हॅन्डलर सतीश गावकर, तांत्रिक पोलीस नाईक संतोष अडके यांच्यासह अनेक पोलीस उपस्थित होते.

Loading Comments