Advertisement

अन् थो़डक्यात अनर्थ टळला! रेल्वे पोलिसांनी वाचवले प्रवाशाचे प्राण

हार्बर मार्गावरील चुनाभट्टी स्थानकावर धावत्या लोकलमधून तोल जाऊन प्रवासी पडला.

अन् थो़डक्यात अनर्थ टळला! रेल्वे पोलिसांनी वाचवले प्रवाशाचे प्राण
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वारंवार धावत्या लोकलमधून प्रवास न करण्याचं आवाहन केलं जातं. शिवाय, धावत्या लोकलमधून दरवाजात उभं न राहण्याच्या आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, तरिही अनेक प्रवासी हे आपला जीव धोक्यात घालून लोकल प्रवास करतात. अशीच एक घटना हार्बर रेल्वे मार्गावरील चुन्नाभट्टी स्थानकात घडली आहे.

हार्बर मार्गावरील चुनाभट्टी स्थानकावर धावत्या लोकलमधून तोल जाऊन प्रवासी पडला. मात्र, स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या रेल्वेपोलिसाने प्रवाशाला तत्काळ खेचून प्रवाशाचा जीव वाचविला. चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर पोलीस अंमलदार नम्रता तांदळे दिवसपाळी कर्तव्यावर होत्या. त्यानंतर चुनाभट्टीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल थांबली होती.

सीएसएमटीकडे लोकल जाण्यासाठी लोकलने वेग वाढला. त्यामुळे लोकलच्या दरवाज्यावर उभ्या असलेला प्रवासी डब्यामधून तोल जाऊन प्लॅटफॉर्मवर पडला. त्यानंतर त्वरीत नम्रता तांदळे यांनी सर्तकता दाखवून त्याला बाजूला केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचविले. त्यानंतर या प्रवाशाला गोंदिया-नागपूर येथे जायचे असल्याने त्याने लगेच दुसरी लोकल पकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून बसविण्यात आले, अशी माहिती वडाळा रेल्वे ठाण्यातील पोलिसांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा