चेंबूरमधील अनधिकृत स्टॉलवर कारवाई

 Chembur
चेंबूरमधील अनधिकृत स्टॉलवर कारवाई

चेंबूर - चेंबूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत स्टॉलवर बुधवारपासून रेल्वेनं कारवाई सुरू केलीये. रेल्वे रुळांजवळ असलेले हे स्टॉल हे अनधिकृत असल्यानं रेल्वेनं नोटिस देत दोन दिवसांत १२ स्टॉलवर कारवाई केली. या कारवाईला विरोध करणाऱ्या चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. आम्ही २५ ते ३० वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करत असून, आमच्याकडे सर्व पुरावे असतानाही ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आर. चिन्नास्वामी या स्टॉलधारकानं केलाय.

Loading Comments