Advertisement

Video : मुसळधार पाऊस थेट बेस्ट बसमध्ये; ड्रायव्हरनं हातात धरली छत्री

मुसळधार पावसानं आता थेट मुंबईच्या बेस्ट बसमध्येच एन्ट्री घेतली. त्यामुळं पावसाच्या पाण्यात भिजू नये म्हणून बसच्या ड्रायव्हरनं छत्री हातात घेऊन बस चालवली.

Video : मुसळधार पाऊस थेट बेस्ट बसमध्ये; ड्रायव्हरनं हातात धरली छत्री
SHARES

मुंबईत अखेर मान्सूननं बुधवारी धडक दिली आहे. मुंबईला पावसानं झोडपून काढलं असून, रस्ते व रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या मुसळधार पावसानं आता थेट मुंबईच्या बेस्ट बसमध्येच एन्ट्री घेतली. त्यामुळं पावसाच्या पाण्यात भिजू नये म्हणून बसच्या ड्रायव्हरनं छत्री हातात घेऊन बस चालवली.

मुंबई आणि उपनगरात मंगळवार रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून मुंबईत पावसानं धुमशान घातलं आहे. मुंबईकरांची खास असलेल्या बेस्ट बसला पावसाचा फटका बसला आहे. लॉकडाऊनची निर्बंध हटवल्यामुळं बेस्ट वाहतूक जोमानं सुरू झाली आहे. पण, पावसामुळं बसमध्ये गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बसमध्ये पावसाचे पाणी बऱ्याच भागातून गळत आहे.

एवढंच काय तर ड्रायव्हरच्या सीटवरही पाणी गळत आहे. त्यामुळे पाण्यात भिजू नये म्हणून चालकाने छत्रीचा आसरा घेतला आहे. विशेष म्हणजे, ही एसी मिनी बस आहे. दोन वर्षांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात या मिनी बस दाखल झाल्या आहे. कमी पैशात गारेगार प्रवास अशी बसची खासियत आहे. पण, पहिल्याच पावसात बसच्या बाहेर आणि आतही पावसाळा अनुभवायला मिळत आहे.

मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अजूनही हा पाऊस मुंबईच्या (Mumbai Rain) अनेक ठिकाणी सुरु आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगर अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव दमदार पाऊस सुरू आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

या मुसळधार पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. पहिल्याच पावसात मुंबतील सखल भागासह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरलं आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळ ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा