Advertisement

'राज्यराणी' एक्स्प्रेसला कुसुमाग्रजांच्या कवितेचे नाव!


'राज्यराणी' एक्स्प्रेसला कुसुमाग्रजांच्या कवितेचे नाव!
SHARES

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दादर सावंतवाडी 'राज्यराणी एक्स्प्रेस'ला आता केशवसुतांच्या कवितेचे नाव देण्यात येणार आहे. सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या गाडीचे नामकरण करण्यात येणार असून, ही गाडी पुढे 'तुतारी एक्स्प्रेस' या नावाने ओळखली जाणार आहे. त्यामुळे आता राज्यराणी ऐवजी केशवसुतांच्या 'तुतारी एक्स्प्रेसने' चाकरमानी प्रवास करणार आहेत. केशवसुतांचे नाव देण्याची अनेक वर्षांची मागणी होती. अखेर ती मागणी मंजूर झाली असून, 'राज्यराणी एक्स्प्रेस'ला 'तुतारी एक्सप्रेस' असे नवे नाव देण्यात येणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मागील सात ते आठ वर्षांपासून कवी केशवसुतांच्या सन्मानार्थ कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडीला त्यांची गाजलेली कविता 'तुतारी'चे नाव द्यावे अशी मागणी करण्यात येत होती. अखेर कोकणचे सुपुत्र असलेल्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही मागणी मान्य करीत या गाडीच्या नामकरणाला हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार सोमवारपासून 'राज्यराणी एक्स्प्रेस' ही 'तुतारी एक्स्प्रेस' म्हणून धावणार आहे. सोमवारी दुपारी 3.30 वाजता कोहिनूर हॉलमध्ये नामकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा