Advertisement

आता महामार्गावरही पालिकेची शौचालये


आता महामार्गावरही पालिकेची शौचालये
SHARES

मुंबई - पालिका क्षेत्रातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर पुरेशा प्रमाणात सार्वजनिक शौचालये नसल्याने या महामार्गांवरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने पूर्व द्रुतगती महामार्गावर 7,  तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर 6 शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील 6 पैकी 5 शौचालये सुरु झाली आहेत. तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील सातही शौचालयांच्या बांधकामाने वेग घेतला आहे.

विशेष म्हणजे ही शौचालये महामार्गांच्या दोन्ही बाजूंना असणार आहेत, ज्यामुळे मुंबईकडून मुलुंड आणि दहिसरकडे जाणाऱ्या-येणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असणाऱ्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांच्या जवळ महापालिकेद्वारे नव्याने बांधण्यात आलेल्या आणि येणाऱ्या या सशुल्क शौचालयांमध्ये स्त्रीयांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा लक्षात घेऊन या शौचालयांचे बांधकाम असणार आहे. विशेष म्हणजे या सर्व शौचालयांच्या आधी किमान 1 किलोमीटर अंतरावर शौचालयाच्या उपलब्धतेविषयी माहिती फलक लावण्यात येत आहेत. जेणेकरुन वाहनचालकांना शौचालय कुठे आणि किती अंतरावर आहे,  याची पूर्वसूचना मिळू शकणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा