Advertisement

ठाण्यात प्रवाशांना दिलासा, २४ मेल-एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म ७ वरून धावणार

यामुळे या फलाटांवरील गर्दी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

ठाण्यात प्रवाशांना दिलासा, २४ मेल-एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म ७ वरून धावणार
SHARES

ठाणे स्थानकातून जलद लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाडीतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5-6 वरून धावणाऱ्या २४ मेल-एक्स्प्रेस फलाट क्रमांक ७ वर वळवण्यात आलेल्या आहेत. यामुळे या फलाटांवरील गर्दी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आणि ट्रान्सहार्बरचे सुरुवातीचे स्थानक असल्याने ठाणे स्थानकात प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

या स्थानकातील फलाट क्रमांक ५-६ वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांची वाहतूक होते. देशभरातून सीएसएमटीकडे ये-जा करणाऱ्या गाड्यादेखील याच फलाटावरून धावतात. यामुळे लोकल प्रवाशांसह मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांचीही गर्दी या फलाटांवर गर्दी असते.

फलाट क्रमांक ५-६ वरील गर्दी कमी करण्यासाठी २४ मेल-एक्स्प्रेस पर्यायी फलाट क्रमांक ७ वर वळवण्यात आलेल्या आहेत. यामुळे लोकल प्रवाशांना फलाटावरून लोकल पकडणे सोयीचे होईल, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सांगितले.

मोठ्या बॅगा असलेल्या मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना फलाट क्रमांक सातवर चढणे-उतरणेदेखील सोपे होणार आहे. फलाट क्रमांक सातला पादचारी पुलाने स्थानकाच्या दोन्ही दिशांना जोडणी असल्याने याचा फायदा लोकल आणि मेल-एक्स्प्रेस या दोन्हींतील प्रवाशांना होणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.


हेही वाचा

Metro Line 2A And 7: डहाणूकर वाडी ते आरे मार्गावरील मेट्रो 'या' दिवशी प्रवाशांसाठी बंद

मेट्रो 7, मेट्रो 2 A मुळे मेट्रो बदलून करावा लागणार प्रवास

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा