Advertisement

आरजीपीपीएल कंपनीकडून मध्य रेल्वेला कमी दरात वीज


आरजीपीपीएल कंपनीकडून मध्य रेल्वेला कमी दरात वीज
SHARES

विजेतून मोठी बचत करण्यासाठी आता रेल्वेने पाऊल उचलले आहे. याकरता रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर प्रा.लि (आरजीपीपीएल) आणि मध्य रेल्वे यांच्यात विजेसंदर्भात करार करण्यात आला असून, पाच वर्षांसाठी आरजीपीपीएलकडून स्वस्त दरातील वीज खरेदी करण्यात येणार आहे. त्यातून दरमहा तब्बल 2 हजार 500 कोटींची बचत होणार आहे. 2025 पर्यंत विजेतून 41 हजार कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दीष्ट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय उर्जामंत्री पियुश गोयल यांनी ठेवले आहे. त्यामुळे रेल्वेला आता विजेतूनही फायदा होणार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सागितले.

आतापर्यत मरे राज्य वीज मंडळाकडून वीज खरेदी करत होती. याकरिता प्रती युनिट 9 रुपये मोजावे लागत होते. मात्र, आरजीपीपीएलकडून मध्य रेल्वेला प्रती युनिट 5.50 प्रमाणे वीज मिळणार आहे. त्यामुळे दरवर्षी मध्य रेल्वेला 500 कोटींची बचत होणार आहे. पाच वर्षांत 2500 कोटींवर बचतीचा आकडा जाणार आहे. त्यामुळे रेल्वेचा यात फायदा होणार असल्याचे पाटील यांनी सागितले..

आरजीपीपीएलच्या विजेचा वापर कल्याणच्या पुढील भागात करण्यात येणार असून, ऑगस्टपासून सीएसटी ते कल्याण या भागात देखील याच कंपनीकडून वीज घेतली जाणार असल्याची माहीती पाटील यांनी दिली. आता आरजीपीपीएल कडून 77 टक्के वीज घेण्यात येत असून, ऑगस्टनंतर 100 टक्के वीज घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेची मोठी आर्थिक बचत होणार आहे. त्यामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा