Advertisement

लॉकडाऊनमुळं रिक्षा-टॅक्सी चालकांवर आर्थिक संकट

रिक्षा-टॅक्सी चालकांवर आता २ वेळच्या जेवणाची, दैनंदिन खर्च करणं कठीण होऊन बसलं आहे.

लॉकडाऊनमुळं रिक्षा-टॅक्सी चालकांवर आर्थिक संकट
SHARES

मुंबईसह देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं वाहतुक सेवाही बंद करण्यात आली आहे. वाहतुक सेवा बंद असल्यानं बेस्ट, रेल्वे, एसटी यांना मोठा तोटा सहन करावा लागतो आहे. अशातचं मुंबईकरांना आरामदायी प्रवासाची सुविधा देणाऱ्या काळी-पिवळी आणि अ‍ॅपवर चालणाऱ्या टॅक्सी-रिक्षाचालकांचे कर्जाचे मासिक हप्ते, आजारपण, दैनंदिन खर्चाचे गणित बिघडून गेले आहे.

सध्या अत्यावश्यक सेवेशिवाय टॅक्सी-रिक्षा रस्त्यावर उतरविण्यास बंदी आहे. या चालकांवर आता २ वेळच्या जेवणाची, दैनंदिन खर्च करणं कठीण होऊन बसलं आहे. राज्य शासनाने रिक्षा, टॅक्सीचालकांकडं वेळीच लक्ष दिलं नाही तर त्यांच्यावर शेतकऱ्यांप्रमाणेच आत्महत्या करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळं रिक्षाचे दररोज मिळणारे उत्पन्न बंद झाले.

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कुटुबीयांना वैद्यकीय खर्च उचलण्यासाठी ओला फाऊंडेशनने ‘ड्राइव्ह द ड्रायव्हर फंड’ उपक्रम सुरू केला आहे. ओलासाठी काम करणारे किंवा न करणारे रिक्षा-टॅक्सीचालक मदतीसाठी ०८०४६८३१४६० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा