बोरीवलीत सापडलेली बॅग आरपीएफने केली परत

 Borivali
बोरीवलीत सापडलेली बॅग आरपीएफने केली परत
बोरीवलीत सापडलेली बॅग आरपीएफने केली परत
See all

बोरीवली - रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) च्या पोलिसांनी प्रवाशाला त्याची बॅग परत केली आहे. 16 जानेवारीला बोरीवलीच्या फलाट क्रमांक आठवर चर्चगेटहून आलेल्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाला बॅग सापडली होती. त्यानंतर त्या प्रवाशाने तात्काळ याची माहिती आरपीएफच्या पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता ती बॅग प्रवासी रोहित बीराभाई मकवाना यांची असून ते धारावीतल रहिवासी असल्याचं समजलं. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या मोबाइल नंबरवर संपर्क करून बॅग रोहित मकवाना यांना त्यांची बॅग आणि 8400 रुपयेही परत केले.

Loading Comments