प्रवाशांची हरवलेली बॅग पोलिसांनी मिळवून दिली

 Churchgate
प्रवाशांची हरवलेली बॅग पोलिसांनी मिळवून दिली

चर्चगेट - दोन प्रवासी अंधेरी ते चर्चगेट लोकलने शनिवारी सकाळी 10.30 प्रवास करत असताना त्यांच्याकडील लॅपटॉप आणि एक बॅग गाडीतच विसरले. गाडीतून उतरताच बॅग विसरल्याचे दोघांच्या लक्षात आलं. प्रवासी हर्ष अग्रवाल, नरेंद्र नेमन यांनी तात्काळ चर्चगेट रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर फौजदार पवार, पारवे आणि होमगार्ड चिकाटे यांनी सलग 1 तास सर्व लोकल शोधून हरवलेल्या दोन्ही बॅग मिळवल्या. दोन्ही बॅगा प्रवाशांच्या असल्याची खात्री करून त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. त्या बॅगेत पैसे होते ते रुग्णालयात भरण्यासाठी दोघे प्रवासी जात असल्याची माहिती चर्चगेट रेल्वे पोलिसांनी दिली.

Loading Comments