रेल्वे पोलिसाने वाचवला महिलेचा जीव

Kurla, Mumbai  -  

रेल्वे पोलिसाच्या सतर्कतेमुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. चालत्या लोकलमधून एक महिला कुर्ला रेल्वे स्टेशनच्या फलाटावर पडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

 

यावेळी के.पी.पंडे यांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला ट्रेनखाली जाता जाता वाचवले. यामुळे के.पी.पंडे यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. या घटनेत महिला किरकोळ जखमी झाली असून ती कुर्ल्यावरून कल्याणला आपल्या मुलीसोबत जात होती. रेल्वे जशी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली तशी ही महिला खाली पडली. दरम्यान या महिलेच्या मुलीला पुढील स्थानकावर उतरवण्यात आले.

Loading Comments