आरपीएफने परत केली बॅग

 Kandivali
आरपीएफने परत केली बॅग

कांदिवली - कांदिवली स्थानकावर तैनात असलेले आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल अरुण कुमार मिश्रा यांना शनिवारी लोकल गाड्यांची तपासणी करताना पाच हजार रुपये, एक आधार कार्ड आणि काही कागदपत्रं असलेली पिशवी मिळाली. या संदर्भाची माहिती अरुण कुमार यांनी बोरिवली स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिजेंद्र सिंह यादव यांना दिली. त्यानंतर मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर बिजेंद्र सिंह यादव यांनी संपर्क साधून प्रवाशाला पोलीस ठाण्यात बोलावलं. प्रवाशाचं नाव मितेश नरेंद्रभाई छाटबार असं आहे.

Loading Comments