रेल्वेत हरवलेली बॅग परत महिलेला

 Churchgate
रेल्वेत हरवलेली बॅग परत महिलेला

चर्चगेट - बोरिवली लोकलमध्ये शनिवारी सायंकाळी प्रथम वर्गाच्या डब्यात इवी गोन्साल्विस या महिलेची बॅग आढळली होती. लोहमार्ग पोलिसांनी ही बॅग सापडल्यावर बॅगेची तपासणी केली असता, त्यात फॅशन डिझाइन कोर्सचं साहित्य आढळलं. ही बॅग वसईत राहणाऱ्या गोन्साल्विस यांची असल्याचं स्पष्ट झाल्यावर लोहमार्ग पोलिसांनी या महिलेशी संपर्क करून तिला याबाबत माहिती दिली. त्यानंतर खातरजमा करून पोलिसांनी ही बॅग त्या महिलेकडे सुपूर्द केली. या बॅगेत फॅशन डिझायनिंगचं सापडलेलं साहित्य साधारण 5 हजारांचं होतं.

Loading Comments