Advertisement

मुंबईत एसी बसस्टॉप? छे, ही तर अफवा!


मुंबईत एसी बसस्टॉप? छे, ही तर अफवा!
SHARES

भर उन्हात बसस्टॉवर बसची वाट पहाणं म्हणजे घामाच्या धारा लागणारच. त्यातच बस वेळेवर आली नाही तर उन्हामुळे अक्षरश: अंगाची काहिली होते. मात्र हेच बसस्टॉप जर फुल्ली एअरकंडिशन्ड झाले तर? आश्चर्य वाटलं ना? हे खरं आहे. मात्र हा बसस्टॉप मुंबईत आहे हे मात्र साफ खोटं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत एसी बस स्टॉप तयार करण्यात आल्याचे मेसेज ट्विटर, फेसबुक आणि वॉट्सअपवर व्हायरल होत आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्येही या एसी बसस्टॉप विषयीची उत्सुकता वाढली होती. मात्र हा एसी बसस्टॉप मुंबईतला नसून, दिल्लीतला असल्याचं समोर आलं आहे.

दिल्लीच्या लाजपत नगरमधला हा बसस्टॉप एसी झालाय. खरंतर एका एसी बनवणाऱ्या कंपनीनं आपली जाहिरात करण्यासाठी थेट या बसस्टॉपमध्येच एसी लावलाय. शिवाय संपूर्ण बसस्टॉप वेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिकने झाकलाय. हे प्लॅस्टिक पारदर्शी असल्यामुळे आतमध्ये बसची वाट पहात असलेल्या प्रवाशांना कोणती बस येत आहे हे सहज दिसू शकतं. आणि आतमध्ये थंडगार एसीचा आनंदही घेता येतो.

आता मुंबईतल्या उन्हामुळे अशा एसी बसस्टॉपची सोय जर मुंबईत झाली तर त्याहून जास्त आनंदाची बाब मुंबईतल्या बस प्रवाशांसाठी नसेल. पण त्यासाठी एक तर त्या संबंधित एसी कंपनीला तरी मुंबईत जाहिरात करावी लागेल किंवा मुंबई महापालिकेला तरी मुंबईकरांचं एसी बसस्टॉपचं 'सोशल व्हायरल' स्वप्न प्रत्यक्षात उतरवावं लागेल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय