Advertisement

पालघरमध्ये सॅटेलाईट विमानतळ उभारणार

हे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले

पालघरमध्ये सॅटेलाईट विमानतळ उभारणार
SHARES

पालघरमध्ये छोट्या विमानांसाठी सॅटेलाईट विमानतळ उभारण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. या विमानतळाच्या सर्वेक्षण- उभारणीला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विमानतळ विकास कंपनीला दिले.

मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी पालघर येथे सॅटेलाईट विमानतळ उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या.

राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया आणि नाशिक विमानतळांवरून उड्डाणे सुरू आहेत.

भारत सरकारतर्फे एमएडीसीला 'बेस्ट स्टेट विथ डेडिकेटेड आऊटलूक फॉर एव्हिएशन सेक्टर' या श्रेणीतील पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना प्रदान करण्यात आला.

यासोबतच कोल्हापूर-रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरणाची आणि अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराची कामे जलदगतीने व्हावीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यावर अमरावरी विमानतळाची धावपट्टी 1372 मीटरवरून 1850 मीटरपर्यंत वाढविण्याचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. अलायन्स एअरलाइन्सने दिवाळीपासूनच येथून विमानसेवा सुरू करण्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानपत्तनच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन आदी उपस्थित होते.



हेही वाचा

कचऱ्यापासून केलेली वीजनिर्मिती वाहनांच्या चार्जिगसाठी

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा