Advertisement

शिवडीत इंधन बचत आणि सुरक्षित वाहन चालक रॅली


शिवडीत इंधन बचत आणि सुरक्षित वाहन चालक रॅली
SHARES

शिवडी - शिवडीमध्ये इंधन बचत आणि वाहन चालक रॅलीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने इंधन बचत आणि सुरक्षित वाहन चालक या उद्देशाने इंधन 'संरक्षण जबाबदारी जण गण भागीदारी' रॅली शिवडी पूर्व येथील शहीद बापू दुरगुडे पेट्रोल पंपावरुन भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक जॉज पॉल यांच्या हस्ते झेंडा फडकवून काढण्यात आली. यावेळी एचपीसीएल आर. के. राय, आयओसीएल एस. के. दुबे, बीपीसीएल प्रशांत खरगे, पीसीआरए संदीप पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

या रॅलीत 20 हजार लिटरची क्षमता असलेल्या एकाच प्रकारचे 30 ऑईल टँकर सहभागी झाले होते. सर्व टँकरमध्ये शिवडी पूर्व येथील पेट्रोल पंपांवर डिझेल भरून सील करण्यात आले. त्यानंतर शिवडीपासून, वडाळा आयमॅक्स, प्रियदर्शनी ते विक्रोळी उड्डाणपुलापर्यंत 15 किलोमीटर आणि पुन्हा त्याच मार्गे शिवडी पूर्व येथील शहीद बापू दुरगुडे पेट्रोल पंपापर्यंत 15 किलोमीटर अशी ही रॅली काढण्यात आली. 30 किलोमीटरच्या प्रवासात ज्या ऑइल टँकरच्या वाहन चालकाने सुरक्षित वाहन चालवून इंधनाची बचत केली असेल आशा वाहन चालकास शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मंगळवारी 4 एप्रिलला सन्मानित करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा