तपासणीविनाच स्कूल बस रस्त्यावर


SHARE

मुंबई उच्च न्यायालयानं प्रादेशिक वाहतूक विभागामार्फत स्कूल बसेसची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र आरटीओनं स्कूल बसची तपासणी थांबवली आहे. त्यामुळे राज्यभरात तपासणीविनाच बसेस चालत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी स्कूल बस ओमर्स असोशियनने केली य. गेल्या वर्षभरात बसमध्ये झालेल्या गैरप्रकारानंतर न्यायालयानं आरटीओला तपासणीचे आदेश दिले होते. मात्र आरटीओनं ही कारवाई बंद केल्यामुळे 7 हजाराहून जास्त स्कूल बसेसला तपासणी अहवाल मिळालेला नाही. त्यामुळे तपासणीशिवाय स्कूलबस रस्त्यावर आणायची की नाही याबाबत बसमालकांसमोर साशंकता निर्माण झालीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

तपासणीविनाच स्कूल बस रस्त्यावर
00:00
00:00