Advertisement

सीटबेल्ट न लावल्यास काय कारवाई होणार? आजपासून कठोर नियम

सीटबेल्ट (seat belt) न लावल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

सीटबेल्ट न लावल्यास  काय कारवाई होणार? आजपासून कठोर नियम
SHARES

आजपासून मुंबईत (Mumbai) चारचाकीमध्ये मागील आसनांवर असणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं बंधनकारक असणार आहे. सीटबेल्ट (seat belt) न लावल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

ही दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून होणार आहे. कारण दरम्यानच्या काळात ज्यांच्या कारमध्ये सीटबेल्ट नाहीत त्यांना तो बसवून घेण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे. सध्या सीटबेल्ट असूनही तो न वापरणाऱ्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत (November) समज दिली जाणार आहे. तर, सीटबेल्ट नसलेल्यांना एक महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे. 

मुंबई वाहतूक पोलीस शाखेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात यसंदर्भातील एक मोठी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार प्रवासी वाहन किंवा टॅक्समधीमध्ये सीटबेल्टची व्यवस्था असूनही प्रवाशांकडून त्याचा वापर होत नसल्यास अशा प्रसंगी चालकाऐवजी वाहनातील प्रवाशांवर ई चलान (E Challan) कारवाई केली जाणार आहे. 

कारवाईमध्ये प्रवाशांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक या साऱ्याची नोंद केली जाणार आहे. तर, कारवाईदरम्यान दंडाची रक्कम प्रवाशांकडून जागच्या जागीच वसूल करण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा