Advertisement

'या' देशांमधून येताय? विमानतळावर स्वखर्चानं RT-PCR चाचणी बंधनकारक

कोविड-१९ विषाणूचे नवीन आणि वेगाने फैलावणारे प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

'या' देशांमधून येताय? विमानतळावर स्वखर्चानं RT-PCR चाचणी बंधनकारक
SHARES

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्व प्रवाशांना विमानतळावर आगमनानंतर स्वखर्चानं आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. कोविड-१९ विषाणूचे नवीन आणि वेगाने फैलावणारे प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करून येणाऱ्यांसाठी या सूचना लागू होतील. ३ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्रीपासून हा नियम लागू राहणार आहे.

सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, हवाई प्रवास करुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची (institutional quarantine) तरतूद रद्द करण्यात आली आहे.

१) आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबई विमानतळावर आगमनानंतर स्वखर्चानं आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक राहणार आहे.

२) चाचणीच्या अनुषंगानं, याआधीच्या परिपत्रकांनुसार अपवाद करण्यात आलेले सर्व निर्णय आता रद्दबादल करण्यात येत आहेत. (जसे की, पूर्ण / दोन्ही कोविड डोस झालेले प्रवासी, ६५ वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक इत्यादी)

३) आंतरराष्ट्रीय प्रवासी यांना मागील ७२ तासांमधील निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे आवश्यक असेल. त्यानंतर ते विमानतळ सोडू शकतात. असा निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल.

४) सर्व प्रवाशांनी विहित नमुन्यातील स्वयंघोषणा-पत्र (self-declaration form) तसंच हमीपत्र (undertaking) भरून मुंबई विमानतळावर नियुक्त संबंधित अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक असेल आणि या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात (home quarantine) राहणं बंधनकारक असेल.

५) सरकारनं निश्चित केलेल्या दरानुसार, प्रति चाचणी रुपये ६०० रुपये याप्रमाणे चाचणीसाठीचे शुल्क आकारण्यात येईल.

६) चाचण्या वेगानं करणं शक्य व्हावं म्हणून प्रतितास सुमारे ६०० प्रवाशांची चाचणी करता येईल, इतक्या क्षमतेची व्यवस्था करण्यात आली आहे.



हेही वाचा

महालक्ष्मी रेसकोर्सवर पालिका पुन्हा उभारणार जम्बो कोविड सेंटर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती; नियमांची कठोर अंमलबजावणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा