Advertisement

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर केवळ ३० मिनिटांत पार होणार

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गिका मेट्रो ८ नावाने प्रस्तावित केली आहे.

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर केवळ ३० मिनिटांत पार होणार
File Photo
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर भविष्यात दोन तासांऐवजी केवळ ३० मिनिटात पार करता येणार आहे.

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिकेच्या बांधणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आणि सिडकोने हालचाली सुरू केल्या आहेत. अंदाजे ३२ किमीच्या या मार्गिकेच्या कामासाठी लवकरच एमएमआरडीए आणि सिडकोकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

एमएमआरडीएने आपल्या ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पात मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गिका मेट्रो ८ नावाने प्रस्तावित केली आहे.

नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान वाढणारी वाहतुक लक्षात घेता मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिका प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र अद्याप ही मार्गिका मार्गी लावण्याच्यादृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नव्हती. पण सिडको आणि एमएमआरडीएने ही मार्गिका उभारण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

अंदाजे ३२ किमीच्या या मार्गिकेच्या मुंबईतील टप्प्याची बांधणी एमएमआरडीए तर नवी मुंबई परिसरातील टप्प्याची उभारणी सिडको करणार आहे. त्यानुसार एमएमआरडीएने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मेट्रो ८ मधील मुंबई विमानतळ ते मानखुर्द अशा १०.१ किमीच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला.

मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ टप्प्याच्या आराखड्यासाठी सिडकोने अर्बन मास ट्रान्झिट कंपनीची नियुक्ती केल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. हा आराखडा येत्या पाच महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तत्काळ या मार्गिकेच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती सिडकोकडून केली जाणार आहे.

डिसेंबरअखेरीस एमएमआरडीएकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे. एकूणच आता मेट्रो ८ मार्गिका लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने मेट्रो ८ मार्गिका मार्गी लावण्यासाठी सिडकोने हालचालींना वेग दिला आहे. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर कमी होणार आहे.

अशी असेल मेट्रो ८ मार्गिका

  • मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिका अंदाजे ३२ किमी
  • अंधेरी ते घाटकोपरदरम्यान भूमिगत मेट्रो मार्गिका; नंतर घाटकोपर ते मानखुर्ददरम्यान आणि त्यापुढेही ही मार्गिका उन्नत असेल
  • मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ अशी मार्गिका पामबीचला समांतर असेल.
  • नवी मुंबई विमानतळ टर्मिनल इमारत ते मुंबई विमानतळ इमारत असा हा थेट मार्ग असेल
  • या मार्गिकेमुळे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर केवळ ३० मिनिटात पार करता येणार
  • वाशी खाडीवरून मेट्रो जाणार; त्यासाठी खाडीवर दोन किमीचा पूल असेल
  • या मार्गिकेत सात मेट्रो स्थानकांचा समावेश असेल
  • २० मिनिटांच्या वारंवारतेने तर ८०-९० प्रति किमी वेगाने मेट्रो धावण्याची शक्यता



हेही वाचा

नवी मुंबई मेट्रो एप्रिलमध्ये सुरू होणार, स्टेशन्स, भाडे जाणून घ्या

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गिकेवरील मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक रेल्वे स्थानकाला जोडणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा