Advertisement

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गिकेवरील मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक रेल्वे स्थानकाला जोडणार

सार्वजनिक वाहतुकीचे एकत्रीकरण आणि गर्दीमुक्त स्थानकासाठी स्वतंत्र व्यवस्था या ठळक वैशिष्ट्यांच्या आधारे पुनर्विकास करण्यात येणार आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गिकेवरील मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक रेल्वे स्थानकाला जोडणार
SHARES

मुंबई सेंट्रल स्थानकाच्या पुनर्विकासासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वे आणि रेल्वे विकास भूमी प्राधिकरण (आरएलडीए) यांनी स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार केला आहे.

सार्वजनिक वाहतुकीचे एकत्रीकरण आणि गर्दीमुक्त स्थानकासाठी स्वतंत्र व्यवस्था या ठळक वैशिष्ट्यांच्या आधारे पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेनुसार कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गिकेवरील मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक हे रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे. तसेच स्थानक परिसरात टॅक्सी आणि बेस्ट बससाठीही थांबा देण्यात येणार आहे.

आनंद राव नायर रस्त्यावरील आरबीआय इमारतीसमोर आणि मराठा मंदिर सिनेमागृहाजवळ ६ मीटर रुंदीचे दोन स्कायवॉक उभारण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे शक्य होईल. रेल्वे रुळांपासून ३२ फूट उंचीवरील फलाटावर स्लॅबच्या माध्यमाने मोकळी जागा (कॉनकोर्स) निर्माण करण्यात येईल. तेथे किरकोळ वस्तू विक्रेत्यांसाठी जागा देण्यात येईल.

फलाटावरून या ठिकाणी जाण्यासाठी सरकते जिने, लिफ्ट उपलब्ध असेल. कॉनकोर्सवर पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा १६ मीटर रुंदीचा पदपथ उभारण्यात येणार आहे. हा पदपथ प्रवासी वगळता अन्य नागरिकांना वापरासाठी खुला ठेवण्यात येणार आहे.



हेही वाचा

अंधेरी, बोरिवली स्थानकावर रेस्टॉरंट-ऑन-व्हील सुरू होणार

मेट्रो ३ च्या कामामुळे २०२४पर्यंत दादरमधील 'हे' रस्ते बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा