Advertisement

मेट्रो ३ च्या कामामुळे २०२४पर्यंत दादरमधील 'हे' रस्ते बंद

२०२४ पर्यंत हे वाहतुकीचे नियम लागू राहतीस, असं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे दादरमधील हे रोड बंद असतील. पर्यायी मार्ग जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर वृत्त

मेट्रो ३ च्या कामामुळे २०२४पर्यंत दादरमधील 'हे' रस्ते बंद
SHARES

मुंबई शहर व उपनगरात मेट्रोच्या कामांनी वेग घेतला आहे. मेट्रो ३चे कामही वेगात सुरु असून दादर येथील भूमीगत मेट्रो स्टेशनसाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मेट्रोच्या कामामुळं वाहतुकीवर थेट परिणाम होणार असून मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. २०२४पर्यंत हे वाहतुकीचे नियम लागू राहतीस, असं नमूद करण्यात आलं आहे.

मेट्रोच्या कामामुळं गोखले रोडवरील कै. अण्णा टिपणीस चौक (स्टिलमॅन जंक्शन) ते गडकरी चौकपर्यंतच्या वाहतुकीवर परिणाम होईल. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय पाहता या मार्गावरील वाहतूक इतरत्र ठिकाणी वळवण्यात येणार आहे.

२९ मार्च २०२३ ते २१ मार्च २०२४ पर्यंत हे नियम लागू असतील. म्हणजेच तब्बल वर्षभर वाहतूक इतरत्र मार्गाने वळवण्यात येणार आहे.

गडकरी जंक्शन ते कै. अण्णा टिपणीस चौक (स्टीलमॅन जंक्शन) पर्यंत उत्तरेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला २४ तास वाहने उभी करता येणार नाही. हे क्षेत्र पोलिसांनी नो पार्किंग करण्यात आलं आहे.

रानडे रोड या मार्गावरील सेनापती बापट पुतळा चौक येथून स्टिलमॅन जंक्शनकडे येण्याकरिता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहिल. म्हणजेच रानडे रोड हा मार्ग स्टिलमॅश जंक्शनकडून सेनापती बापट पुतळा चौकाकडे जाण्यासाठी वन-वे मार्ग असेल.

पोर्तुगीज चर्चकडून गोखले रोड उत्तरेकडून येणाऱ्या वाहतुकीसाठी कै. अण्णा टिपणीस चौक (स्टिलमॅन जंक्शन) येथून डावे वळण घेऊन पुढे न्या. रानडे रोड, दादासाहेब रेगे मार्गाने गडकरी जंक्शन येथे आल्यानंतर (स्टिलमॅन जंक्शन) येथून उजवे वळण घेवून पुढे न्या. रानडे रोड, पानेरी जंक्शन, डावे वळण, एन.सी. केळकर मार्गाने कोतवाल गार्डन येथून दादर टी.टी. कडे जाण्यास मार्गक्रमण करतील.



हेही वाचा

सीएसएमटीजवळील हिमालय पादचारी पूल प्रवाशांसाठी सुरू

गृहनिर्माण संस्थांविरोधात घरबसल्या ऑनलाइन तक्रार करता येणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा