अाता गोरेगांवहून थेट करा पनवेलपर्यंतचा प्रवास


अाता गोरेगांवहून थेट करा पनवेलपर्यंतचा प्रवास
SHARES

मुंबई उपनगरातून थेट पनवेलपर्यंत प्रवास करताना भल्याभल्यांची दमछाक होते. पण अाता मुंबईकरांसाठी अानंदाची बातमी अाहे. त्यांना अाता गोरेगावहून पनवेलपर्यंत थेट प्रवास करता येणार अाहे. हार्बर रेल्वे मार्गाच्या गोरेगांवपर्यंतच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला या मार्गावरून प्रवास सुरू होणार अाहे.सुरुवातीला गोरेगाव-सीएसएमटी ट्रेन

गोरेगांववरून हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वेगाड्या सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत हा प्रवास फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच असेल. त्यानंतर हा प्रवास पनवेलपर्यंत असेल.


याअाधीही होती अंधेरी-पनवेल सेवा 

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकावरून पनवेलपर्यंत ट्रेनसेवा सुरू अाहे. अाता गोरेगांववरून हार्बर रेल्वेमार्गावरील सेवा सुरू झाल्यानंतर गोरेगांववरूनही थेट पनवेलपर्यंत प्रवास करता येईल.

संबंधित विषय