ट्रान्स हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक

  CST
  ट्रान्स हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक
  मुंबई  -  

  रूळांच्या देखभालीसाठी आणि तांत्रिक दुरूस्तीसाठी ठाणे-वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर 13 आणि 14 एप्रिल या दोन दिवशी दुपारी 12.35 ते 2.05 या दीड तासांत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान रूळांची देखभाल-दुरुस्ती करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार असून, या दरम्यान ठाणे-वाशी, पनवेल, बेलापूर, नेरूळ या दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. या दोन्ही दिवशी 11 अप आणि 11 डाऊन अशा एकूण 22 फेऱ्या रद्द होतील. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली असून, या दरम्यान प्रवाशांनी अन्य मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

  रद्द होणाऱ्या फेऱ्या

  ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या फेऱ्या - 12.12, 12.40, 13.01, 13.25,13.57
  ठाण्याहून नेरूळकडे जाणाऱ्या फेऱ्या - 12.20, 13.10, 13.37
  ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या फेऱ्या - 12.52, 13.18, 14.05
  वाशीहून ठाण्याकडे जाणाऱ्या फेऱ्या - 12.21, 12.49, 13.18, 13.40, 14.01
  नेरूळहून ठाण्याकडे येणाऱ्या फेऱ्या - 12.10, 12.31, 13.00, 13.50
  पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या फेऱ्या - 12.18, 13.04

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.