Advertisement

'या' रेल्वे स्थानकांत एटीव्हीएमसाठी विशेष स्वतंत्र कक्ष

रेल्वे प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं एटीव्हीएमसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

'या' रेल्वे स्थानकांत एटीव्हीएमसाठी विशेष स्वतंत्र कक्ष
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटासाठी मोठ्या रांगेत तात्काळत उभं राहावं लागतं. या रांगेमुळं स्थानकात प्रचंड गर्दी होत असून, प्रवाशांची गैर सोय होत आहे. त्यामुळं ही गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं एटीव्हीएमची (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन) सुविधा उपलब्ध करून दिली. अशातच प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं एटीव्हीएमसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २७ उपनगरीय स्थानकात ६८ कक्ष उभारण्यात येणार आहेत.

६०२ मशीन

सध्यस्थितीत मध्य रेल्वेवर ६०२ मशीन असून, या मशीन तिकीट खिडक्यांच्या बाजूला किंवा स्थानकात अन्य ठिकाणी उभ्या केलेल्या आहेतया मशीनसमोरच होत असलेल्या गर्दीमुळे स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या अन्य प्रवाशांनाही मनस्ताप होतोस्थानकातील गर्दी टाळतानाच प्रवाशांना तिकीट एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावं या उद्देशाने एटीव्हीएमसाठी विशेष स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

२४ लाखांच उत्पन्न

रेल्वे स्थानकात एका दिशेला अथवा अन्यत्र हे कक्ष उभारून त्यामध्ये ४ ते ५ मशीन्स ठेवण्यात येणार आहेत. एकाच रांगेत प्रवाशांना या मशीनमधून तिकीट उपलब्ध व्हावं, यासाठी व्यवस्थाही करण्यात येणार आहे. सध्या सीएसएमटी स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्धही केली जात आहेया कक्षात रेल्वेकडून जाहिरातही केली जाणार आहे. त्यामुळं वर्षांला २४ लाख रुपयांचं उत्पन्न उद्दिष्टही मध्य रेल्वेनं ठेवलं आहे.

'या' स्थानकात कक्ष


स्थानक
कक्ष
एलटीटी, सॅण्डहर्स्ट रोड, मशीद, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, नाहूर, कोपर, ठाकुर्ली
प्रत्येकी १
विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, मुंब्रा, दिवा, डोंबिवली
प्रत्येकी २
दादरसायनमुलुंड, कळवा
प्रत्येकी ३
सीएसएमटी, घाटकोपर, कांजूरमार्ग
प्रत्येकी ४
कुर्ला स्थानकात
ठाणे, कल्याण
प्रत्येकी ७
हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: बाप्पासाठीच्या प्रसादावर एफडीएची नजर

गणेशोत्सव २०१९: 'चिचंपोकळीचा चिंतामणी'च्या देखाव्यात यंदा ७५ फुटी शिवलिंगRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा