Advertisement

गणेशोत्सव २०१९: 'चिचंपोकळीचा चिंतामणी'च्या देखाव्यात यंदा ७५ फुटी शिवलिंग

मुंबईतल्या लालबाग परिसरातील प्रसिद्ध असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळात यंदा ७५ फुटी शिवलिंग असलेला आकर्षक देखावा पाहायला मिळणार आहे.

गणेशोत्सव २०१९: 'चिचंपोकळीचा चिंतामणी'च्या देखाव्यात यंदा ७५ फुटी शिवलिंग
SHARES

मुंबईतल्या लालबाग परिसरातील प्रसिद्ध असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळात यंदा ७५ फुटी शिवलिंग असलेला आकर्षक देखावा पाहायला मिळणार आहे. 'चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ' यंदा शतक महोत्सवी साजर करणार असून, या वर्षात कला दिग्दर्शक नितीनकुमार यांच्या संकल्पनेतून नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार आहे.

मंगल कलशातून जलाभिषेक 

या देखावा सादर करताना मुख्य प्रवेशद्वारावर ७५ फुट उंचीचं शिवलिंग तयार करण्यात येत असून, शिवलिंगावर मंगल कलशातून जलाभिषेक होणार आहे. त्यामुळं यंदा हा देखावा मुंबईतील सर्व गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. 'चिंचपोकळीचा चिंतामणी' मंडळाची यंदाची बाप्पाची मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू यांनी साकारली आहे. तसंच या मूर्तीची प्रभावळही या देखावाला शोभेल अशी बनविण्यात आली आहे

प्रसिद्ध आगमन सोहळा

'चिंचपोकळीचा चिंतामणी'चा आगमन सोहळा देशभरात प्रसिद्ध आहे. चिंतामणीच्या आगमनावेळी दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तसंच, यंदा या मंडळानं राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीतील पूरग्रस्तांना मदत म्हणून ५ लाखांची मदत केली आहेहेही वाचा -

खबरदार! 'नवसाला पावणारा' बाप्पा असा दावा केल्यास कारवाई होण्याची शक्यता

महापालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासनसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा